दारुच्या नशेत तरुणाने पत्नी, मेव्हणी आणि स्वत: वर तेल टाकून पेटवून घेतले…….

हरियाणा, २४ फेब्रुवरी २०२१: हरियाणाच्या यमुनानगरमध्ये एक भयानक प्रकरण समोर आले आहे. घरगुती कलहामुळे एक तरुण दारुच्या नशेत सासुरवाडीत पोहचला आणि तिथे पत्नी मेव्हणी आणि तेल स्वत: वर तेल ओतून आग लावून घेतली.यामुळे आसपासच्या भागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

यमुनानगरमधील गांधीनगर पोलिस स्टेशन परिसरातील शिवपुरी बी कॉलनीत वाद झाल्याने युवकाने पत्नीवर तेल ओतून तिला पेटवून दिले. या आगीत पत्नी आणि मेव्हणीसुद्धा गंभीर रित्या भाजल्या आहेत. आजूबाजूला लोक जमा झाले आणि आरोपीला पकडण्यास सुरुवात केली, म्हणून त्याने स्वत: ला पेटवून घेतले.

कशी तरी लोकांनी आग विझविली आणि जबरदस्तीने जळून गेलेला तरूण सापडला,त्यांची पत्नी आणि मेव्हणी यांना रुग्णालयात दाखल केले आसून प्रकृती गंभीर चिंताजनक झाल्याने तरूणाला पीजीआय रुग्णालया येथे रेफर केले. त्यांची पत्नी आणि मेव्हणीवर त्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

तरुण उत्तर प्रदेशचा आहे…..

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कसबा पोलिस ठाणे परिसरात राहणारा ३२ वर्षीय रवींद्र कुमार याचा विवाह शिवपुरी बी कॉलनीत राहण्यार्या लक्ष्मीशी झाला होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी या दाम्पत्यामध्ये वाद झाला होता. याबाबत ठाणे भवन पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली. तेव्हापासून लक्ष्मी तिच्या माहेरी राहत होती. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रवींद्र सासरच्या घरी आला आणि त्याने पत्नीला आणि सासरच्यांना धमकावलं कि तो स्वत:ला आणि पत्नी लक्ष्मीला जाळेल, पण तो दारुच्या नशेत आसल्यामुळे कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही.

लपत घरात प्रवेश केला….

आरोपी रवींद्रची सासू संजेश म्हणाली की सूने नेहमी वाद घलता, त्याबरोबरच भांडण करत तिला मारहाण करत होता. बराच काळ हे कथित गोंधळ घरी सुरू होते आणि रात्री दोनच्या सुमारास रवींद्र घराजवळ येऊन लपला होता. यानंतर त्याने भिंत तोडून घरात प्रवेश केला आणि खोलीत झोपलेल्या लक्ष्मी आणि तिची धाकटी बहीण सीमा यांच्यावर तेल लावून पेटवून दिले.

पेटवून दिल्यामुळे दोघींची आर्त किंचाळी निघाली आणि त्या तशाच खोलीच्या बाहेर आल्या तेव्हा आग सर्वत्र पसरली होती. जवळपासच्या घरातील लोक जमले.आरोपी रवींद्र ला पकडण्याची लोक धडपड करु लागले, तेव्हा त्याने स्वतःवर तेल ओतून पेटवून घेतले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटना स्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, असे गांधीनगर पोलिस स्टेशन प्रभारी जसबीर सिंह यांनी सांगितले.तक्रार नोंदविल्या गेल्यावरच वादाचे नेमके कारण कळू शकेल असही ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा