हत्तीनं मानली नाही हार, ठरतोय खरा हिम्मतवाला!

मुंबई, १८ जुलै २०२० : मनुष्यावर एखादं छोटं संकट जरी आलं की लगेच हार मानून टोकाचं पाऊल उचलतो किंवा तो मानसिक तणावात जातो. मात्र सोशल मीडियावर हत्तीचा एक फोटो आणि व्हिडियो तुफान व्हायरल होत आहे. हिंम्मत न हारता धैर्य आणि प्रेरणा देणारा हा फोटो युझर्सनी तुफान पसंत केला आहे. हत्तींची जलक्रीडा, खाताना किंवा खेळताना अगदी त्यांच्यातील भांडणाचे व्हिडीओही सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात पाहायला मिळाले मात्र हा फोटो त्यापेक्षाही खास आणि वेगळा आहे.

या फोटोमध्ये आपण पाहू शकता हत्तीला एक पाय नसून त्याला बनावट पायाचा आधार देऊन चालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या हत्तीनं आपली जगण्याची आणि जिंकण्याची उमेद न सोडता संयम राखून या पायाचा आधार घेऊन हळूहळू चालताना दिसत आहे.

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी ह्या हत्तीचा विडिओ सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. त्यांनी जिद्दीचं कौतुक केलं आहे. एका अपघाता दरम्यान हत्तीच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो कापावा लागला होता. तीन पायावर हत्ती उभा राहू शकत नाही म्हणून त्याला कृत्रिम पाय बसवण्यात आला. या कृत्रिम पायाच्या साहाय्यानं हत्ती चालण्याचा प्रयत्न करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा