बॉलिवूडच्या शहंशाहची कोरोनावर मात

मुंबई, दि. २ ऑगस्ट २०२०: बॉलिवूडचे शहंशाह आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे. त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली.

११ जुलै रोजी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन या दोघींचा देखील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला.

या सर्व बच्चन कुटुंबावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. ऐश्वर्या आणि आराध्याने कोरोनावर मात केल्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी देखील कोरोनाला हरवले आहेत.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बिग बी काही दिवस घरीच क्वारंटाईन राहणार आहेत. बिग बींना कोरोनाची लागण झाली तेव्हा अनेकांनी ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे बिग बी यांनी आपल्या चाहत्यांचे, मित्र परिवाराचे आभार मानले आणि प्रार्थना केल्यामुळे सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

सोबतच आई – वडिलांचं स्मरण करत त्यांचीही आठवण काढली आहे. त्याचप्रकारे बिग बी ज्या रुग्णालयात उपचार घेत होते त्या नानावटी रुग्णालयाचे आणि तेथील कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांनाही धन्यवाद दिले आहेत. आता फक्त अभिषेक बच्चन बरे व्हायचे बाकी असून ते सध्या नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

एकूणच आजच्या बातमीने अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा