लंडन, १७ जून २०२० : कोरोनाने जवळपास सर्व देशातील व्यवहार, सार्वजनिक कार्यक्रम, सभा व अन्य गोष्टी बंद आहेत यातच खेळांवरही बंदी होती परंतू आता जवळपास १०० दिवसांनी पुन्हा इंग्लिश प्रिमियर सुरू होणार आहेत.
जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी ही एक चांगली व आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात मोठी फुटबॉल लीग अर्थात इंग्लिश प्रीमियर लीग बुधवारपासून सुरू होत आहे.
कोविड १९ मुळे या लिगमधील संघांचे खेळाडू १०० दिवसांपासून मैदानात उतरले नव्हते. पण आता ही स्पर्धा सुरू होणार असल्याने फुटबॉल प्रेमींना खुप आनंद झाला आहे.
या स्पर्धेमध्ये समाविष्ट अव्वल १० संघांना छोट्या संघांशी स्पर्धा करायची आहे. नंबर १ च्या लिव्हरपुलची बचावात्मक पातळी ही १. ६ आहे तर नंबर २ च्या मँचेस्टर सिटीची डिफॉल्ट पातळी १. २ आहे, म्हणजेच यांना इतर संघापेक्षा उर्वरित सामना जिंकणे त्यांच्यासाठी सोपे आहे.
सामन्यांचे वेळापत्रक स्पर्धेच्या तारखेसह सामन्यांचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. ४० दिवस चालणा-या या स्पर्धेत ९२ सामने होणार असून सर्व २० संघांना ९२ सामने खेळावे लागणार आहेत. काहींना ९ तर काहींना १० सामने खेळावे लागणार आहेत. लीगचा शेवटचा सामना ही २५ जुलै २०२० रोजी होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी