गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय मार्क झुकरबर्ग यांच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची एन्ट्री, समाजमाध्यमांद्वारे दिली गोड बातमी

मार्क झुकरबर्ग यांच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची एन्ट्री, समाजमाध्यमांद्वारे दिली गोड बातमी

कॅलिफोर्निया, २५ मार्च २०२३: फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग आणि त्यांची पत्नी डॉ प्रिसिला चॅन यांनी त्यांच्या तिसऱ्या बाळाचं एकत्र स्वागत केलं. मार्क झुकरबर्ग यांनी इंस्टाग्रामवर त्यांच्या तिसऱ्या मुलीच्या जन्माची घोषणा केलीय.

“जगात तुझं स्वागत आहे, ऑरेलिया चॅन झुकेरबर्ग! तू खूप मोठा आशीर्वाद आहेस,” असा कॅप्शन देत मुलीच्या नजरेला नजर मिळवत झुकेरबर्ग यांनी एक पोस्ट शेअर केलीय. तर याच पोस्ट मधील दुसर्‍या चित्रात प्रिसिला चॅनने लहान मुलीला तिच्या हृदयाशी कवटाळलं आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी शेअर केलेल्या या पोस्टला लाखोंमध्ये लाईक्स मिळत असून समाज माध्यमांद्वारे अनेकांनी कुटुंबातील या नव्या पाहुण्याचं अभिनंदन केलंय.

२०१२ मध्ये विवाहबंधनात अडकल्यानंतर मार्क आणि प्रिसिलाला मॅक्स आणि ऑगस्ट ही दोन मुलं आहेत. आत्ता ऑगस्ट ही पाच वर्षाची तर मॅक्स सात वर्षाची आहे. झुकेरबर्ग यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात,’ पुढील वर्षी मॅक्स आणि ऑगस्टला नवीन बाळ बहिण मिळत आहे’ असा कॅप्शन टाकत त्यांच्या पत्नी बरोबरचा फोटो शेअर केला होता.

नवीन वर्षाच्या निमित्ताने, “नवीन वर्षाच्या शुभेच्छा! २०२३ मध्ये येणारे सर्व साहस आणि प्रेम येथे आहे, असं म्हणत गर्भवती असलेल्या पत्नीबरोबरचा अजून एक फोटो मार्क झुकेरबर्गने शेअर केला. या कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणांमध्ये पोस्ट खाली कमेंट्स देत त्यांचे चाहते देखील आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. घरी आलेल्या नवीन बाळाचं सर्वांनीच स्वागत केलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

error: Content is protected !!
Exit mobile version