गोल पोस्ट गुन्हा बापच बनला हैवान, स्वत:च्या मुलीवर केले अत्याचार….

बापच बनला हैवान, स्वत:च्या मुलीवर केले अत्याचार….

पनवेल, दि. १९ जुलै २०२०: एकिकडे कोरोनाने थैमान घातले आहे तर दुसरीकडे गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नाही. पनवेल मधील क्वांरनटाईनच्या अत्याचाराच्या बातमीला ४८ तास आले नाही तोच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिघी येथे घडली. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने शुक्रवारी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नराधम बापावर गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती- पत्नी आहेत. त्यांना ११ वर्षाची मुलगी आहे. आरोपी नराधम पित्याने गुरुवारी रात्री मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने याबाबत आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आसून पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा कदम या पुढील तपास करीत आहेत. तर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटने मुळे पुन्हा एकदा माणुसकी बरोबर नात्याला काळीमा फासली गेली आहे.राज्यात गेल्या ४ दिवसात मुलींवर अत्याचाराच्या ३ घटना घडल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version