युपीएससीत यश मिळवलेल्या ‘मोहिनी’च्या वडिलांचे दुःखद निधन; आनंदावर शोककळा

13
युपीएससीत यश मिळवलेल्या 'मोहिनी'च्या वडिलांचे दुःखद निधन; आनंदावर शोककळा
युपीएससीत यश मिळवलेल्या 'मोहिनी'च्या वडिलांचे दुःखद निधन

Yavatmal: महागाव तालुक्यातील वाकड येथील मोहिनी प्रल्हाद खंदारे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगच्या निकलात 844 वा क्रमांक पटकावून आपल्या गावाचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले. मात्र, त्यांच्या या मोठ्या यशाच्या आनंदावर दुःखाची काळी छाया पडली आहे. रविवारी (28 एप्रिल) सकाळी मोहिनीचे वडील प्रल्हाद खंदारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

प्रल्हाद खंदारे शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्या मागे एक मोठ मुलगा, पत्नी, मुलगी मोहणी आणि सून असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा विक्रांत खंदारे सध्या जिल्हा न्यायाधीश असून त्यांची सून देखील न्यायाधीश आहे. तर मुलगी मोहिने हिने नुकतेच यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त केल होत.ज्यावेळी मुलगी आयस अधिकारी झाली तेव्हा मुलीच्या यशाच्या आनंदात वडिलांनी गावात स्वागताचे बॅनर लावले, मिठाई वाटप केली होती. मात्र, अचानक आलेल्या या दुःखद घटनेमुळे महागाव, पुसद आणि उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि परिचितांनी श्रद्धांजली वाहत त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण काढली.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर