गोल पोस्ट गुन्हा बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ग्वालियर, २० फेब्रुवरी २०२१: ग्वालियर मधे हवसचा असा प्रकार समोर आला आहे जिथे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासली आहे. शहराच्या गोला मंदिर परिसरात राहण्यार्या अल्पवयीन मुलीवर गेल्या एका महिन्यापासून तिचा बाप रोज बलात्कार करत होता. विकृतीचा कळसाने तेव्हा शिखर गाठले. जेव्हा बापाने त्याच्या मित्रालाही तिला नशेचा पदार्थ खाऊ घालून अत्याचार करायला भाग पाडले.

जेव्हा या यातना, वेदना मुलीला असाह्य वाटू लागल्या तेव्हा तिने चाइल्ड लाईनवर फोन करून तक्रार नोंदवली. ज्यानंतर पोलिसांनी कलम ३७६ आणि पाॅक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून नराधम बापाला अटक केली आहे. तर त्याचा मित्र मात्र आजून ही फरार आहे. ज्याचा शोध पोलीस घेत आहेत.

८ वी मधे शिकणारी विद्यार्थ्यिनी आहे पीडिता……

एसपी अमित सांघी यांनी सांगितले की चाइल्ड लाईन ने पीडित अल्पवयीन ची काउंसलिंग केली आहेत.त्यांनी सांगितले पीडिता ८ वीच्या वर्गात शिकत आहे.ती आपल्या वडिल आणि बहिणी बरोबर त्या घरात राहत आहे.

जवळपास एक महिन्या आधी पिडिता आपल्या खोलीत झोपलेली आसताना तेथे तिच्या वडिलांनी खोलीत येऊन तिच्या बरोबर अश्लील चाळे करू लागला आणि पिडितेने त्याचा विरोध केला असता तिला जिवे मारण्याची धमकी देत आपल्याच मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर ही त्या नरधमाची भूख शांत झाली नाही आणि तो रोज येण्यार्या दिवशी तिला आपल्या हवसचा बळी बनवू लागला आणि त्याने पुढे मुलीला मित्राच्या घरी सोडले जिथे मित्राने ही तिला आम्ल पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला.

चाइल्ड लाइन मधे या घटनेची तक्रार केली……

याच दरम्यान अल्पवयीन मुलीला हे सर्व असहनीय वेदना झाल्या आणि तिने आपबिती आपल्या आईला सांगितले आणि मग अल्पवयीन मुलीने चाइल्ड लाईन मधे या घटनेची तक्रार केली. त्यानंतर चाइल्ड लाईन ने याची माहिती महिला बाल विकास आणि पोलिसांना दिली. हा सर्व प्रकार जेव्हा समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात कलम ३७६ आणि पाॅक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम बापाला बेड्या ठोकल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version