दिल्ली, १६ जुलै २०२० : तिहार कारागृहात तैनात असलेली दिल्ली पोलिसातील एक २३ वर्षीय महिलेचा बुधवारी तीच्या दिल्लीच्या पालम गावातील तिच्या भाड्याच्या घरात मृत अवस्थेत सापडली , अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना असा संशय आहे की पीडित महिलेच्या ओळखीच्या एखाद्याने तिची हत्या केली असावी. हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यात तीचे आई वडिल राहत असताना ती येथे भाड्याच्या घरात राहत होती. २०१८ मध्ये दिल्ली पोलिसात प्रवेश घेऊन सध्या ती दिल्ली सशस्त्र पोलिसांच्या तिसऱ्या बटालियन मधे कार्यरत होती. तिहार तुरूंगात तीला दैनिक डायरी एन्ट्री रायटर म्हणून ड्यूटी ऑफिसरच्या कार्यालयात तैनात करण्यात आले होते , अशी माहिती पोलिसांनी दिली.
तपासणी करण्यासाठी आलेल्या मुलीने तिला बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेले पाहिले व त्यानंतर तिने तिच्या नवऱ्याला व पोलिसांना हि माहिती दिली. सदर मुलीने एका आठवड्यापूर्वीच भाड्याने घर घेतल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
“पोलिसांना घटनास्थळी पोहचताच पलंगावर पडलेल्या शरिरावरील खुणा असलेल्या तीचा मृतदेह सापडला. गुन्हेशाखेच्या पथकाने त्या जागेची पाहणीही केली.पोलिस उपायुक्त देवेंद्र आर्य यांनी सांगितले की खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे सांगितले. तपासादरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले आणि एका फुटेजमध्ये बुधवारी पहाटे एक माणूस तिच्या घरातून निघताना दिसला, असल्याची ही माहिती पोलिसांनी दिली.
तिहार तुरूंगात दुपारी १ ते सायंकाळी ७ या शिफ्टमध्ये या महिलेने काम केले.मंगळवारी ती तिहार येथे ड्युटीवर आली आणि सायंकाळी ७ वाजता आपली शिफ्ट पूर्ण करुन घरी निघून गेली, असे अन्य एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आणि शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण शोधले जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी