या दिवशी खेळला जाणार आयपीएल -१४ चा अंतिम सामना

नवी दिल्ली, ८ जून २०२१: इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) चौदावे सत्र पुन्हा कधी सुरू होईल?  ४ मे रोजी आयपीएल पुढे ढकलण्याची घोषणा झाल्यापासून हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम आहे.  यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २९ मे रोजी एसजीएमनंतर जाहीर केले की आयपीएल -१४ चे उर्वरित सामने युएईमध्ये खेळले जातील.  याबाबत निश्चित तारीख जाहीर करणे बाकी होते जी आता जाहीर करण्यात आली आहे.
 वृत्तसंस्था एएनआयच्या मते, आयपीएल -१९ पुन्हा १९ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळला जाईल.  खास गोष्ट म्हणजे या दिवशी देशात दसरा साजरा केला जाईल.  बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, भारतीय क्रिकेट बोर्ड आणि अमीरात क्रिकेट बोर्ड यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठका चांगल्या झाल्या आहेत आणि आयपीएल -१४ चे उर्वरित सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे यशस्वीपणे पार पडतील असा भारतीय मंडळाला विश्वास आहे.
“चर्चा खरोखरच चांगली होती आणि बीसीसीआयच्या एसजीएमच्या अगोदर एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने आयपीएलचे आयोजन करण्यास तोंडी मान्यता दिली होती,” असे या अधिकाऱ्याने सांगितले.  १९ सप्टेंबरपासून आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे.  अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होईल.  बीसीसीआय नेहमीच उर्वरित अंतिम सामन्यांना पूर्ण करण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी हवा असल्याचे सांगत होते.
आयपीएल -१४ च्या उर्वरित सामन्यांमध्ये परदेशी खेळाडू सहभागी असतील का?  यासंदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अन्य देशांच्या क्रिकेट मंडळाशी चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक निकाल लागण्याची आशा भारतीय मंडळाला आहे.  ते म्हणाले की बहुतेक परदेशी खेळाडू उपलब्ध होतील असे आम्हाला वाटते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा