बारामती, ५ फेब्रुवरी २०२१: लडकत सायन्स अकॅडेमी ने शिक्षण प्रणाली मध्ये एक पाउल पुढे टाकत JEE / NEET/ MHT-CET च्या विद्यार्थ्यांसाठी इंटरॅक्टिव्ह टच पॅनेल ची सुविधा उपलब्ध केली आहे. वाढत्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीसोबत इंटरॅक्टिव्ह टच पॅनल च्या मदतीने विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा उत्साह वाढतो तसेच या नवीन प्रणालीने एकाग्रते सोबत शिकवलेले मुद्दे जतन करून पुन्हा त्याच्या नोट्स उपलब्ध होतात,यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो तर महत्वाच्या विषयांतर्गत सूत्रे, आकृती सहज व आकर्षक रित्या टच पॅनल वर उपलब्ध होतात.
विषयाच्या संकल्पना समजण्यासाठी सहजपणे याचा उपयोग होतो.त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत गुणवत्ता वाढीस चालना मिळणार आहे. लडकत सायन्स अकॅडेमी नेहमीच आताच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा अभ्यास सहज, सोपा व्हावा यासाठी प्रयत्नशील असते.
अकॅडेमी च्या इन्ट्रॅकटिव्ह टच पॅनल मुळे पालक व शिक्षण संस्थांमधून आभार व्यक्त केले जात आहेत. विद्यार्थ्यांना आता शिक्षण घेण्यामध्ये चांगली मदत होणार आहे. असे अकॅडेमी चे संचालक नामदेव व गणेश लडकत यांनी सांगितले.
लडकत सायन्स अकॅडमी गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा प्रतीसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांची प्रगती केंद्र बिंदू मानुन डिजिटल प्लेटफॉर्मच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणार आहे.
न्यूज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव