कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचा दर्शानाचा पहिला मान कोरोना योद्ध्यांचा…..

कोल्हापूर २३ नोव्हेंबर २०२०: राज्यात हळूहळू लॉकडाऊन हे शिथील होऊन लोकांचे जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.अश्यातच सर्वसामान्यांचा भावनेचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मंदिरे.ज्यासाठी राज्यात चांगलेच राजकारण रंगले आणि सरते शेवटी सरकारने गेल्या सोमवारी (१६ नोव्हेंबर)पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं उघडण्यास सरकारनं परवानगी दिली.

राज्यातील सर्व महत्त्वाची धार्मिक स्थळं देखील सुरू करण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारनं सर्व धार्मिक स्थळं आत्तापर्यंत बंद ठेवली होती. मात्र, आता ती सुरू करण्यात आली असून भाविकांकडून मंदिरांमध्ये सर्व नियमांचं पालन देखील होताना दिसत आहे. तसंच मंदिर प्रशासन देखील सर्व खबरदारी घेतायत.

एकीकडे राज्यात कोरोना महामारीचा प्रकोप हा आता सावरताना दिसत आहे.तर देवस्थान व्यवस्थापन समिती,पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरच्या वतीने या मंदिर उघडण्याच्या खास निर्णयामुळे कोविड काळात काम करणार्या प्रत्येक कोरोना योद्ध्यांला दर्शनाचा मान दिला व तसेच त्यांचे आभार देखील मानले.आणि आई महालक्ष्मी या जगभरातून कोरोना संपूर्ण नष्ट होऊ दे असे साकडे घातले.

देवस्थान च्या सुप्त उपक्रमाला देखील तेथील प्रत्येक स्थानिकांनी कौतुक केले.तर जवळपास आठ महिने बंद आसलेले देऊळ उघडले आणि आई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोरोना योद्ध्यांना पुढे हा लढा लढण्याचे एक वेगळे बळ मिळाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा