देशातली पहिली किसान रेल्वे सेवा आज पासून सुरु

नाशिक, ७ ऑगस्ट २०२० : नाशिवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी देशातली पहिली किसान रेल्वे सेवा आज पासून सुरु होत आहे. हि रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा नाशिकजवळच्या देवळाली ते बिहारमधल्या दानापूर स्थानकापर्यंत जाणार असून यातून भाजी व फळांची वाहतूक होणार आहे.

यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार या रेल्वेसेवेचा प्रारंभ केल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे.

हि रेल्वेगाडी उद्या सकाळी देवळाली स्थानकावरून निघून सुमारे ३२ तासांनी दानापूर इथं पोचेल. या रेल्वेसेवेचा लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली असून नाशिक, मनमाड, भुसावळ इत्यादी परिसरातल्या फळे, फुले, कांदा तसंच भाजी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल.

यासाठी नाशिक जवळच्या लासलगाव इथं तापमान नियंत्रित गोदाम बांधण्याचे काम सुरु झालं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा