पुणे, २८ डिसेंबर २०२०: युवक सप्ताह हा सर्व युवकांसाठी अतिशय महत्त्वाचा सप्ताह असतो. परिषदेतील कार्यकर्त्यांना कामात उर्जा मिळवून देण्यासाठी तसेच प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला कार्यकर्ता अशा विचाराने या युवक सप्ताहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वताच्या जीवन धोक्यात टाकून जनसेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांना समर्पित एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगर यांनी या युवक सप्ताहात दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी करण्याचे ठरवले आहे.
कोणताही उपक्रम राबवायचे झाले तर पूर्व नियोजन ते पूर्ण नियोजन करावे लागते. याकडे लक्ष देत आयोजित केलेल्या बाईक रॅलीचे पूर्व नियोजन करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगर यांच्या वतीने कार्यकर्त्यांसोबतची पहिली खुली बैठक दिनांक २७ डिसेंबर २०२० रोजी भारतमाता अभ्यासिका, पर्वती पायथा, पुणे येथे घेण्यात आली. रॅली मागील उद्धेश, त्यासाठी करावयाची तयारी या बैठकीत झाली. तसेच, विविध गट, खाते निर्माण करून त्यांच्या प्रमुखांची घोषणा देखील करण्यात आली.
या बैठकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री नागसेन पुंडगे, महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. शरद गोस्वामी, पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड