मुंबई, १७ मार्च २०२३: कसोटी मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे फॉरमॅटमध्ये युद्ध रंगणार आहे. आजपासून (१७ मार्च) उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारताचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असताना, स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. पाहुण्या संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियातून परतला नाही, त्यामुळं स्मिथकडं कर्णधारपद सोपवण्यात आलंय. स्मिथने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांचं नेतृत्वही केलं होतं.
दोन वर्षांहून अधिक प्रतीक्षेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे फॉरमॅटमध्ये भिडणार आहेत. दोघांमधील शेवटचा वनडे सामना ऑस्ट्रेलियात खेळला गेला. २०२० च्या अखेरीस भारतीय संघाच्या दौऱ्यावर नोव्हेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ ने विजय मिळवला. त्याच वेळी, भारतामध्ये दोन्ही संघांमधील शेवटची मालिका तीन वर्षांपूर्वी जानेवारी २०२० मध्ये खेळली गेली होती. भारताने ती मालिका २-१ ने जिंकली.
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे विश्वचषक होणार आहे आणि अशा परिस्थितीत दोन्ही संघांच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. भारतीय संघ या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांचा कर्णधार रोहित शर्माशिवाय प्रवेश करेल, जो वैयक्तिक कारणांमुळे रजेवर जाणार आहे. दुसऱ्या सामन्यातून तो मालिकेत पुनरागमन करेल. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या जबाबदारी सांभाळेल. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया देखील आपला कर्णधार पॅट कमिन्सशिवाय मैदानात उतरणार आहे, जो आपल्या आईच्या निधनामुळं या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ कर्णधारपद कायम ठेवणार आहे.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
१७ मार्च – पहिला एकदिवसीय, वानखेडे स्टेडियम, मुंबई
१९ मार्च – दुसरी वनडे, वायएस राजा रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम
२२ मार्च – तिसरा एकदिवसीय, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मलिक शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, मार्कस स्टॉइनिस, अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिश, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड