गोल पोस्ट आरोग्य औंध मध्ये सापडला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

औंध मध्ये सापडला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

औंध, दि. १८ मे २०२०: औंध मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच एम्स हॉस्पिटलमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. परंतु हा रुग्ण औंध परिसरातील नवता. तसेच त्याला तातडीने वाय सी एम येथे हलवण्यात आले होते. परंतु आता औंध मधील एका स्थानिक व्यक्तीला संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

सदर रुग्णा औंध मधील रहिवासी असून एका सोसायटी मध्ये राहणारा होता. या रुग्णास रुग्णालयात हलवण्यात आले आहे. औंध भागामध्ये या घटनेवरून चर्चा होण्यास सुरुवात झाली होती. लोकांच्या म्हणण्यानुसार दोन रुग्ण सापडले असल्याचे बोलले जात होते परंतु अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असता केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे असे समजले.

न्यूज अनकट ने संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणी केली असता रुग्ण सापडला असल्याचे स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांनी रुग्णाची वैयक्तिक माहिती देण्यास नकार दिला तसेच ते कायद्याला अनुसरून देखील नाही. परंतु संबंधित सोसायटी सील करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे व या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version