नासाने मंगळावर पाठवलेले इंजीन्यूटी हेलिकॉप्टर भरणार उड्डाण

यूएस, ६ एप्रिल २०२१: अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने मंगळाच्या पृष्ठभागावर हेलिकॉप्टर पाठवले होते. मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हरच्या पोटात झाकलेले हे हेलिकॉप्टर मंगळ ग्रहावर पोहोचले होते. ते कांगारुंच्या पिल्ला प्रमाणे रोव्हरच्या पोटात लपले होते. त्याचे नाव – पर्सिवरेंस मार्स हेलिकॉप्टर. काही दिवसांपूर्वी इंजीन्यूटीने मंगळाची हवा तपासली. आता त्याने तेथील पृष्ठभागालाही स्पर्श केला. हे हेलिकॉप्टर मंगळाच्या पृष्ठभागावर आणि तेथील वातावरणावर रोटरक्राफ्ट तंत्रज्ञान वापरू शकेल की नाही याची चाचणी घेतली जाणार आहे.


रोव्हरने चार इंचाच्या वर यशस्वीरित्या इंजीन्यूटी हेलिकॉप्टरला सोडले. हेलिकॉप्टर पृष्ठभागावर पडल्यानंतर रोव्हर पुढे सरकला. १.८-किलो इंजीन्यूटी हेलिकॉप्टर पर्सिरव्हन्स रोवर च्या ४ पायांमध्ये आता लपवले गेले होते ज्यामुळे त्याला सुरक्षितता प्रदान झाली. हे कव्हर २१ मार्च रोजी काढले गेले. नासाने ट्विटर हँडलवर हेलिकॉप्टर च्या उड्डाणा बाबत माहिती दिली आहे.


इंजीन्यूटी मार्स हेलिकॉप्टरच्या आत सौरऊर्जेसह बॅटरी चार्ज प्रणाली उपलब्ध आहे. त्याच्या पंखांवर सौर पॅनेल आहे. हेलिकॉप्टरची पाती जेवढी तापेल तेवढ्या प्रमाणात त्याची बॅटरी देखील चार्ज होईल. यासह ही उष्णता हेलिकॉप्टर च्या आत मध्ये देखील साठवली जाईल. जेणेकरून मंगळावरील बदलत्या तापमानाचा सामना या हेलिकॉप्टरला करता येईल. मंगळ ग्रहावर दिवसाचे तापमान ७.२२ डिग्री सेल्सिअस असते तर रात्री हे तापमान घटून -९० डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते.


असे सांगितले जात आहे की, इंजीन्यूटी हेलिकॉप्टर ११ एप्रिल रोजी मंगळवार उड्डाण भरेल. याविषयी चा डेटा नासाला पुढच्या दिवशी पुसून म्हणजेच १२ एप्रिल रोजी भेटण्यास सुरुवात होईल. हे रोटरक्राफ्ट बनविण्यासाठी नासाने ८५ मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे ६२३ कोटी रुपये खर्च केले आहेत. या हेलिकॉप्टर चे पंखे दर मिनिटाला २५३७ इतक्या फेऱ्या मारतात.


नासाचा असा विश्वास आहे की, जर परिस्थिती अनुकूल असेल तर जेजेरो क्रिएटर वर हे हेलिकॉप्टर अनेक उड्डाणे घेईल. ही उड्डाणे पुढील ३१ दिवसांसाठी असतील. हे दिवस मंगळानुसार असतील. प्रत्येक फ्लाइट हाईट १६.५ फूटांपेक्षा जास्त असू शकत नाही. हेलिकॉप्टर एका वेळी ३०० फूट अंतर व्यापेल. यानंतर, ते खाली उतरेल आणि पुन्हा चार्जिंग होण्यासाठी थांबेल.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा