आज ऍशेसमध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना, या प्लेइंग इलेव्हनसह दोन्ही संघ खेळणार

पुणे, १९ जुलै २०२३ : आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस २०२३ चा चौथा कसोटी सामना एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर, इंग्लंड येथे सुरू होईल. १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान खेळला जाणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. ऍशेस कसोटी मालिका इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना, २०२३ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. दरम्यान इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मोबाईलवर सोनी लिव एपवर पाहता येईल.

विशेष म्हणजे या मालिकेत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये सलग २ सामने जिंकले आहेत. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दणदणीत विजयाची नोंद केली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया सध्या २-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरत आहेत.

इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन-
बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टंग, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन-
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा