गोल पोस्ट स्पॉटलाइट बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, या दिवशी होणार ...

बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, या दिवशी होणार ‘बिग बॉस मराठी 4’चा ग्रॅंड प्रीमिअर

मुंबई, ११ सप्टेंबर २०२२ : लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे ‘बिग बॉस’. या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. ‘बिग बॉस मराठीच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर आणि कलर्स मराठी वाहिनीने या नव्याकोऱ्या पर्वाचा नवाकोरा प्रोमो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. या पोस्टनुसार बिग बॉस मराठी ४ हा सीझन ०२ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होतोय. या पोस्टमध्ये असंं म्हटलं आहे की, ‘१०० दिवसांचा हा खेळ. कधी पास, कधी फेल. पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा ग्रॅंड प्रीमिअर २ ऑक्टोबरला संध्या ७ वा. सोम – शुक्र रात्री १० वा. शनि- रवि रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त कार्यक्रम आहे. पण तरीही या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. ‘बिग बॉस मराठी’चे तिन्ही पर्व सुपरहिट ठरल्यानंतर प्रेक्षक चौथ्या पर्वाची प्रतीक्षा करत होते. काही दिवसांपूर्वी या शोचा प्रोमोसुद्धा रिलीज झाला होता.

ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु होणार आहे. आता या बिग बॉस मराठीमध्ये कोण कोण कलाकार असणार, पुन्हा तोच राडा होणार का? मैत्री आणि प्रेमाचे वारे वाहणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आता या नव्या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक असणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version