पुरंदर देि.१० ऑक्टोबर २०२० : पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपुर पालखी महामार्गावरील दौंडज येथे आज शनिवार (दि.१०) पहाटेच्या सुमारास महामार्गावरील खड्डे चुकविताना एक दहाचाकी मालवाहतुक ट्रक महामार्गाशेजारील ओढ्यात गेला. या भीषण अपघातामध्ये जीवीतहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळवरून मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे पुणे पंढरपुर पालखी महामार्गावरील दौंडज येथे पुणे महामार्गावरील खड्डे चुकविताना एक चारचाकी मालवाहतुक ट्रक महामार्गाशेजारील ओढ्यात गेला. या भीषण अपघातामध्ये जीवीतहानी झाली नसली तरी ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंढरपुर पालखी महामार्गावरील दौंडज खिंड ते निरा दरम्यान जागोजागी खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागते दरम्यान ट्रक ओढ्यामधुन बाहेर काढण्यासाठी महामार्गावरील वाहतुक रोखुन धरल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
पुणे पंढरपूर मार्गावरील जेजुरी ते नीरा दरम्यानचा मार्ग अरुंद असून त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत.केंद्रीय महामार्ग प्रधिकरणाकडे हा रस्ता असल्याने व तो सोलापूर विभागाकडे असल्याचे यावर दुर्लक्ष होते आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही संबधित अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत.किमान वेळी खड्डे तरी बुजवारे बाबांनो!! अशी आर्त हाक येथील प्रवाशी व वाहन चालक करीत आहेत.पण गेंड्याची कातडी पांघरलेले हे अधिकारी काहीच करीत नाहीत. अडीच वर्षा पूर्वी जेजुरी पोलिसांनी स्वतः हे खड्डे बुजवले होते.त्यावेळी तत्कालीन आमदार व मंत्री विजय शिवतारे यांनी पोलिसांचीच चांगलीच खरडपट्टी काढली होती.आपल्या कामात लक्ष द्या दुसऱ्याच्या कामात ढवळढवळ करू नका अशी तंबीच त्यांनी दिली होती. मात्र त्यानंतर दोन वर्षात त्या संबंधित विभागाकडून खड्डे बुजविण्यात आले नाही.आता तुमचं राजकारण चुलीत घाला आमचा रस्ता नीट करा अन्यथा मंत्र्यांच्या गाड्या या पुढे या मार्गावरून जावू देणार नाही असा इशारा या भागातील लोकांनी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे