गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा नागपूर येथे कोरोना झाल्याचे समजताच मुलीला शाळेत प्रवेश नाकारला

नागपूर येथे कोरोना झाल्याचे समजताच मुलीला शाळेत प्रवेश नाकारला

नागपूर : अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच आज सकाळी संबंधित व्यक्तीच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

याच व्यक्तीचा मुलगा शहरातील एका कॉलेजमध्ये शिकत असून त्यालाही कॉलेजात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
अमेरिकेहून आलेली एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
सकाळी त्या व्यक्तीची मुलगी शाळेत गेली तेव्हा तिला प्रवेश नाकारला. यावेळी नेमके कारण माहीत नसल्याने इतर पालकांनी शाळेला विनवणी केली. शाळेने मान्य न केल्याने पालक आक्रमकही झाले. शेवटी मुलीच्या वडिलांना कोरोना झाल्याचे शाळा प्रशासनाला स्पष्ट सांगितल्यानंतर हुज्जत घालणाऱ्या पालकांनी माघार घेतली.

error: Content is protected !!
Exit mobile version