लग्न सोहळयात पोलीसच बनले मुलीचे मामा

6

मंचर, दि.११ मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर लॉकडाऊन सुरू आहे. पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहे.

या काळात अनेक ठिकाणी खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवत पोलीस विविध सामाजिक कार्य करत आहेत. असाच प्रसंग पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलिस स्टेशन हद्दीत माणुसकीचे दर्शन घडवणारा अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे.

झाले असे की, अवसरी बुद्रुक येथील अंकुश चवरे यांचा मुलगा तुषार व लोणी वाळुंजनगर येथील कैलास शंकर वाळुंज यांची मुलगी आरती यांचा विवाह काही महिन्यांपूर्वी नियोजित करण्यात आला होता. त्यांचा साखरपुडा झाल्यानंतर विवाहाच्या मुहूर्तावर लॉकडाऊन असल्याने विवाहास अडचणी निर्माण झाल्या.

दरम्यान यावर तोडगा काढत दोन्हीही कुटुंबीयांनी अवसरी येथे लग्न करण्याचे ठरविले. या विवाह सोहळ्याबाबत मंचर पोलिस स्टेशन ला कळविण्यात आले होते. लॉकडाऊन असल्याने अनेक नातेवाईक उपस्थित राहू शकत नसल्याने पोलिसांनीच विवाह सोहळ्यात वधू च्या मामांची जबाबदारी पार पाडली. हा मान मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार हरिभाऊ नलावडे यांना मिळाला.
यावेळी सोशल डिस्टन्सचे नियम पाळत इतर सहा व्यक्ती व ब्राम्हणांच्या साक्षीने तुषार व आरती यांचा विवाह पार पडला.

न्यूज अनकट प्रतिनीधी: साईदिप ढोबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा