गोल पोस्ट महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांच्या ताफ्यात ‘जिक्सर २५० एसएफ’ या स्पोर्ट्स बाईकचा समावेश

ट्रॅफिक पोलिसांच्या ताफ्यात ‘जिक्सर २५० एसएफ’ या स्पोर्ट्स बाईकचा समावेश

मुंबई, दि. २६ जुलै २०२० : सध्या महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेला मोठ्या ताण – तणावात काम करावे लागत आहे. तरी पोलिसकर्मी आपले कर्तव्य चोख बजावत आहे. आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांना अनेकदा चांगल्या दुचाकीची गरज असते. त्यामुळे आता आपले कर्तव्य बजावण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांना  जिक्सर २५० एसएफ ही स्पोर्ट्स बाईक देण्यात आली आहे.

महाराष्ट्र वाहतूक पोलिसांना शनिवारी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) मोहिमेअंतर्गत १० प्रगत दुचाक्या मिळाल्या आहेत. ‘जिक्सर २५० एसएफ’ या स्पोर्ट्स बाईकमध्ये सायरन, ब्लिंकर लाइट्स आणि इतर अ‍ॅडव्हान्स सिस्टम यामधे सज्ज आहेत. असे मुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version