कोरोना लसबद्दल चांगली बातमी, १२ डिसेंबर रोजी अमेरिकेत पहिली लस दिली जाणार

वॉशिग्टंन, २३ नोव्हेंबर २०२०: सध्या सर्वांचं लक्ष कोरोना लसिकडं लागलं आहे. सर्व देश या दिशेनं जबरदस्त प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या लसीबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. अमेरिकेतील कोरोना लस कार्यक्रमाचे प्रमुख मोंसेफ सलोई यांनी म्हटलं आहे की ११ डिसेंबर रोजी अमेरिकेत कोरोना विषाणूची पहिली लस लागू केली जाऊ शकते.

खरं तर, कोरोना लस तयार करणार्‍या अमेरिकेच्या दिग्गज कंपनी फायझरनं अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडं अर्ज पाठवला आहे आणि या लसीच्या तातडीच्या वापरासाठी परवानगी मागितली आहे. एफडीए लस सल्लागार समितीची बैठक १० डिसेंबर रोजी होणार आहे.

अमेरिकन कंपनी फायझरनं कोरोना विषाणूंविरूद्ध ९५% प्रभावी लस विकसित केली आहे आणि ती लसीकरणासाठी अमेरिकन सरकारकडून आपत्कालीन वापराची मागणी करीत आहे. फायझरनं म्हटलं आहे की ते आपत्कालीन वापराची प्रक्रिया लवकर सुरू करू शकते.

सीएनएनशी बोलताना सलोई म्हणाले की या बैठकीत परवानगी दिली गेली तर दुसर्‍या दिवशी ही लस उपलब्ध होऊ शकंल. ते म्हणाले की, “मंजुरी मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत ज्या ठिकाणी लसीकरण केले जाईल अशा ठिकाणी लस पोहोचविणं हे आमचं ध्येय आहे. म्हणून मी आशा करतो की हे ११ किंवा १२ डिसेंबरपर्यंत लस उपलब्ध होऊ शकंल.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा