रेड झोनमधील लॉक डाऊन वाढणार सरकारचा विचाराधीन; रुग्णांची वाढतेय संख्या

पुणे : सध्या राज्यासह देशात सध्या कोरोनाचे मोठया संकटातून आपण जात आहोत. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यासारख्या शहरी भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही वाढत असलेली आकडेवारी सरकारची डोकेदुखी ठरत असल्याचे पहायला मिळत आहे. महत्वाच्या शहरी भागात आकडेवारी कमी होत नसल्यानेच रेड झोनमधील लॉकडाऊन ३ मे नंतरही कायम ठेवायचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण राज्यभरात आहे.त्यामुळेच आधीपासूनच रेड झोनमध्ये असलेले मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर हे जिल्हे अजूनही रेडझोनमध्ये असून, येथे आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे.

सद्य स्थितीत राज्यातील सगळ्यात सर्वाधिक आकडेवारी ही मुंबईत असून, आतापर्यंत कोरोना रुग्णाची आकडेवारी ही ३ हजारहून अधिक झाली आहे. त्यातच प्रभादेवी, वरळी, धारावी या भागात कोरोना रुग्ण सर्वाधिक आहे. त्यातच सोमवारी ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे ही वाढणारी आकडेवारी सरकारची डोकेदुखी ठरू लागली आहे.

रेड, ऑरेंज, ग्रीन झोनचे निकषही बदलले

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५ हजारांवर गेला आहे. त्यामुळे राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष देखील बदलण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल. या नव्या निकषांनुसार रेड झोन भागात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५ पेक्षा जास्त असल्याचा निकष कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, औरंगाबाद, सांगली हे जिल्हे अजूनही रेड झोनमध्येच आहेत. तर ऑरेंज झोनसाठी रुग्णसंख्येचा निकष बदलून आता दिवसांचा निकष लावण्यात आला आहे. त्यानुसार १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस कोणत्या जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही, तर तो जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येतो. तर ग्रीन झोनसाठीचे निकष बदलून इथेही आता दिवसांचा निकष लावण्यात आळा आहे. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये सलग २८ दिवस कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण सापडला नाही, अशा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा