उस्मानाबाद, २१ ऑक्टोबर २०२०: मागील दिवसांत अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. याची पाहणी करण्यासाठी, आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उस्मानाबाद दौऱ्यावर आलेले आहेत.
झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यावर मार्ग काढण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न चालू आहे. अशा मध्ये शेतकऱ्यांनी धीर धरावा, खचून जाऊ नये. हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. तसेच, शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल, अशा मदतीबाबत या शासनाकडून मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या उस्मानाबाद दौऱ्यातील नुकसानीची पाहणी केल्यावर येथील शेतकरी बांधवांना दिली.
यावेळी त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, विभागीय सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, तसेच शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड