नवी दिल्ली, दि. २४ जून २०२०: पतंजलीने मंगळवारी दावा केला की कोरोनापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी एक औषध शोधले आहे. त्याचबरोबर आयुष मंत्रालयाने माध्यमांच्या वृत्ताच्या आधारे ही बाब विचारात घेतली आहे.
मंत्रालयाचे म्हणणे आहे की कंपनीने केलेल्या दाव्यांचे तथ्य आणि वैज्ञानिक अभ्यासाबाबत मंत्रालयाकडे कोणतीही माहिती पोहोचली नाही. यावर पंतजलीचे योग गुरु बाबा रामदेव म्हणाले की आम्ही मंजुरी घेऊनच क्लिनिकल चाचणी केली आहे.
यावर बाबा रामदेव म्हणाले की, हे सरकार आयुर्वेदाला प्रोत्साहन देत आहे, आतापर्यंत जे कम्यूनिकेशन गॅप होते ते दूर झाले आहे आणि Randomised Placebo Controlled Clinical Trials चे सर्व मानक १००% पूर्ण झाले आहेत. आहे. आम्ही आयुष मंत्रालयाला ही सर्व माहिती दिली आहे.
योग गुरु रामदेव म्हणाले की ‘जर इतके मोठे काम केले गेले आहे तर त्यावर बरेच प्रश्न उभे राहणे साहजिक आहे. प्रत्येकाला उत्तर दिले गेले आहे. हे जे सरकार आहे ते आयुर्वेदिक विरोधी नाही. मंजुरी मिळाल्यानंतरच पुढे चालू. नोंदणी क्रमांकही देण्यात आला आहे. १०० टक्के क्लिनिकल चाचणीसाठी सरकारने ठरवलेल्या निकषांचे आम्ही पालन केले. सरकारने ज्या मान्यता देणे आवश्यक होत्या त्या सर्व घेतल्या आहेत. मला असे वाटते की जी काही कम्यूनिकेशन गॅप होती ती आता दूर झाली आहे. आता यात वाद नाही. आचार्य रामकृष्ण यांनी ट्विट करूनही याच गोष्टीची पुन्हा सांगितल्या आहेत.’
ते म्हणाले की आम्हाला कोणतेही प्रकारच्या जाहिरातीची आवश्यकता नाही लोक स्वतःहून हे औषध मागताहेत लोकांपर्यंत हे औषध पोहोचवण्यासाठी मला कसल्याही प्रकारच्या विज्ञानाची गरज नाही. जे क्लिनिकल ट्रायल केले गेले होते त्याची आम्ही घोषणा केली. आम्ही नीम्सच्या डॉक्टरांनाही विचारणा केली आहे. आम्ही या विषयी सर्व माहिती प्रकाशित केले आहे आमच्याकडे २८० रुग्णांचा डाटा आहे.
वास्तविक, बाबा रामदेव यांनी काल कोरोनाच्या औषधाला सुरुवात केली. बाबा रामदेव कोरोनिल नावाने कोरोनाचे औषधे आणले आहेत आणि असा दावा करत आहेत की या औषधाने कोरोनातील रुग्णांना ७ दिवसात शंभर टक्के बरे केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी