सरकार विकणार आयआरसीटीसी मधील १५ ते २० टक्के हिस्सा

नवी दिल्ली, ९ सप्टेंबर २०२०: भारतीय रेल्वे आयआरसीटीसी मध्ये सुमारे १५ ते २० टक्के हिस्सा विकण्याच्या विचारात सरकार आहे. आयआरसीटीसीमधील हा हिस्सा ऑफर फॉर सेल (ओएफएस) च्या माध्यमातून विकण्याचा सरकार विचार करीत आहे. तसेच हा व्यवहार किमान हप्त्यांमध्ये पूर्ण करण्यास सरकार विचार करत आहे.

गेल्या महिन्यात, आयआरसीटीसीमध्ये विक्री व्यवस्थापित करण्यासाठी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) व्यापारी बँकर्संकडून १० सप्टेंबरपर्यंत निविदा मागविल्या. परंतु, रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) मधील प्रस्तावावरील भागभांडवलाची रक्कम जाहीर केली नाही.

त्यानंतर, ४ सप्टेंबर रोजी संभाव्य निविदाकारांसह प्री-बिड बैठक झाली. डीआयपीएएमने आता संभाव्य बिडर्सनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आपल्या वेबसाइटवर प्रतिसाद दिला आहे.

भागभांडवलाच्या टक्केवारीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डीआयपीएएम म्हणाली, “सूचक टक्केवारी १ ५ ते २० टक्के आहे. नेमकी माहिती निवडलेल्या व्यापारी बँकर्सबरोबर सामायिक केली जाईल.” आयआरसीटीसीमध्ये सध्या सरकारची ८७.४० टक्के हिस्सेदारी आहे.

सेबीच्या सार्वजनिक होल्डिंग स्टँडर्डची पूर्तता करण्यासाठी सरकारने कंपनीतील आपला हिस्सा ७५ टक्क्यांपर्यंत आणावा लागेल. आयआरसीटीसीचे शेअर्स मंगळवारी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये २.५७ टक्क्यांनी घसरून १,३७८.०५ वर बंद झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा