सरकारचा महामंडळे नियुक्तीचा ५०-२५-२५ चा फॉर्म्युला ?

मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ : हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने प्रवेश केल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. या प्रवेशाने भाजपसह शिंदे गटातील नेत्यांची गोची झाली होती. आता सत्तावाटपात तिसरा भागिदार आल्याने सत्ता वाटपातही तिन वाटण्या झाल्या. यातून आता नवी समिकरणे आणि नवी सुत्र पाहायला मिळत आहेत.

आता महामंडळाच्या आणि विविध शासकीय समित्यांवरिल नियुक्यांवरून अशाच वाटण्या आणि नवी फॉर्मुला समोर येत आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्तीचा फॉर्म्युला ठरल्याचे समोर येत असून तो ५०-२५-२५ चा आहे. याच्याआधी भाजप आणि शिंदे गट यांच्यात ६०-४० असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सामील झाल्यानंतर यात बदल झाला असून,भाजप मोठा असल्याने त्यांच्या वाट्याला ५०, शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी २५-२५ महामंडळ देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे.

दरम्यान महामंडळे वाटपाच्या फॉर्म्युल्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी महामंडळा विषयी कुठलाही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनीही माध्यमांशी बोलताना याविषयी सांगितले. महामंडळ वाटपा संदर्भात कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा करून सर्वानुमते यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा