सातारा २४ नोव्हेंबर २०२३ : राज्य सरकारच्या वतीने दूध दराबाबत काढण्यात आलेल्या जीआरची अंमलबजावणी दूध संघाकडून होत नाही, त्यांच्याकडून कमी दराने दूध खरेदी केले जाते. त्यामुळे सातारा तालुक्यातील शिवथर गावात रयत क्रांती संघटनेच्या वतीने, या शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी देण्यात आली.
सातारा तालुक्यातील शिवथर गावात रयत क्रांती संघटनेच्या वतीने, रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आले. जीआर जाळण्याचे आंदोलन करताना कोणताही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी आंदोलनस्थळी सातारा तालुका पोलिसांचा बंदोबस्त होता.
यावेळी बोलताना प्रकाश साबळे म्हणाले, शासनाकडून शेतकऱ्यांची दूध दराच्या बाबतीत फसवणूक केली जात आहे. दूध दराचा शासनाचा जीआर हा काढलेला असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून २८ ते २९ रुपयांकडून दूध खरेदी केली जात आहे. दूध संघाकडून दूध दर शेतकऱ्यांना कमी दिला जातोय. याचा राज्यभरात संघटने कडून निषेध नोंदविण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले