पेट्रोल आणि डिझेल मधून सरकारची मोठी कमाई, लोकसभेत केले मान्य

नवी दिल्ली, १६ मार्च २०२१: देशात २७ फेब्रुवारी पासून पेट्रोलच्या किमतीमध्ये बदल झालेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर सरकारसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र काल सरकारने लोकसभेत हे मान्य केले आहे की, पेट्रोल आणि डिझेल च्या माध्यमातून सरकार मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहे. यामुळेच जनतेला पेट्रोल साठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तर जाणून घेऊयात सरकार किती कमाई करते पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून.

प्रति लिटर पेट्रोल मागे ३३ रुपये, प्रति लिटर डिझेल मागे ३२ रुपये ची कमाई

सरकारने कालच्या सत्रात लोकसभेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना मान्य केले की, ६ मे २०२० पासून पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क, उपकर आणि अधिभार यांच्या माध्यमातून क्रमशः ते ३३ रुपये आणि ३२ रुपये एवढी कमाई होत आहे. तर मार्च २०२० पासून ते पाच मे २०२० या दरम्यान सरकार पेट्रोल आणि डिझेलवर क्रमशः २३ आणि १९ रुपयांची कमाई करत होते.

मागील वर्षी जानेवारीपासून ते आत्तापर्यंत १३ रुपयांची वाढ

लोकसभेत सरकारने सांगितले की, १ जानेवारी २०२० ते १३ मार्च २०२० यादरम्यान सरकारची पेट्रोल आणि डिझेल मधून क्रमशः २० रुपये आणि १६ रुपये अशी कमाई होत होती. अशाप्रकारे ३१ डिसेंबर २०२० शी तुलना केली गेली तर सरकारची प्रति लिटर पेट्रोल मधून १३ रुपये आणि प्रति लिटर डिझेल मधून १६ एवढी कमाई वाढली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा