पुरंदर १२ ऑक्टोबर २०२० :नेसरी येथील रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयची विद्यार्थिनी कोमल चवरे हिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अंतर्गत राबवला जाणारा ‘ग्रामीण कृषी जागरूक आणि औद्योगिक कार्यानुभव’ या उपक्रमा अंतर्गत लपतळवाडी या गावांमध्ये शेतीविषयक विविध उपक्रम राबवले .
या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल योग्य दरात योग्य ठिकाणी विकता यावा व शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी महाकृषी ऍग्रो स्टार, ऍग्रो वन, किसान अभिमान ॲप अशा विविध मार्केटिंग मोबाईल ॲप्लिकेशनची शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली व शेतकऱ्यांना शेतीविषयक निगडित विविध शासकीय योजनांची माहिती दिली .
पशुसंवर्धन आणि दुग्ध शास्त्र विभाग अंतर्गत शेतकऱ्यांना स्वच्छ दुग्ध उत्पादन विषयी प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांना येणाऱ्या अडचणींवर योग्य ते उपाय सांगून त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
न्युज अनकट प्रतीनिधी :- राहुल शिंदे