मुंबई, ७ ऑगस्ट २०२०: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला झोडपत असलेला पाऊस आता कमी होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. काही दिवसांपुर्वी मुंबईच्या धरणांची पाणी पातळी ४०% होती ज्या मुळे मुंबईवर पाणीसंकट ओढावले होते. बृहन्मुंबई महापालिके ने २०% पाणी कपातीचा निर्णय घेतला आणि दोन दिवस पावसाने अशी हजेरी लावली की पिणयाच्या पाण्याचा प्रश्न मिटला.
दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने मुंबईतले सगळे रेकाॅर्ड मोडले. मुंबईकरांना या पावसाने पुन्हा एकदा २६ जुलैची आठवण करुन दिली.बुधवारी मुंबईत ३२८.२८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आणि तो दिवसभरातला सर्वात मोठा पाऊस असल्याची नोंद झाली. तर हवामान खत्याने ऑगस्ट महिन्यातील हा पाऊस ४५ वर्षातला सर्वात मोठा पाऊस असल्याचे सांगितले. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने लपंडाव खेळला. तर या खेळात पावसाने आणखी एक विक्रम केले.
दोन दिवसाच्या मुसळधार नंतर ३ -या दिवशी देखील तशीच हजेरी पाऊस मुंबई मध्ये लावेल अशी हवामान खात्याने माहिती दिली. त्याबरोबरच त्या नंतर हा पावसाचा जोर ओसरेल असेही सांगितले होते. त्यामुळे पावसाची संततधार ही मुंबई सह उपनगरात आज पाहायला मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी