कर्ज जास्त कमाई कमी, या तीन आघाड्यांवर सरकारची वाढू शकते चिंता

नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२०: कोरोना संकटात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी तीन चिंता वाढण्याची माहिती समोर आलीय. या तिन्ही समस्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहेत. यामुळं येणाऱ्या काळात सरकारच्या अडचणी वाढू शकतात.

ताज्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारचं कर्ज वाढलं आहे. आकडेवारी सांगते की जून २०२० च्या अखेरीस सरकारचं उत्तरदायित्व १०१.३ लाख कोटी रुपयांवर गेलंय.

यापूर्वी मार्च २०२० च्या अखेरीस ते ९४.६ लाख कोटी होतं. एका वर्षापूर्वी म्हणजेच जून २०१९ अखेर सरकारचं एकूण कर्ज ८८.१८ लाख कोटी रुपये होतं. या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२०-२१ मध्ये १५ सप्टेंबरपर्यंत एडवांस टॅक्स कलेक्शनसह केंद्र सरकारच्या एकूण कर संकलनात २२.५ टक्क्यांनी घट झालीय.

एकूण टॅक्स कलेक्शन २,५३,५३२.३ कोटी रुपयांवर आलं आहे. जूनच्या तिमाहीत मागील वर्षाच्या तुलनेत एकूण टॅक्स कलेक्शन मध्ये ३१ टक्क्यांची घट झाली आहे.

११ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलन साठ्यात गेल्या आठवड्यात सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर ते ३५.३ कोटी डॉलर्सने घसरून ५४१.६६ अब्ज डॉलरवर गेले आहे. त्याआधी, ४ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलन साठा ५८.२ कोटी डॉलर्स’नं वाढून ५४२.०१ अब्ज डॉलरवर पोचला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा