मुंबई, ६ जुलै २०२० : मुंबईतील रूग्णालयात एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला. मृत्यू नंतर रुग्णालयाने मृत व्यक्तिच्या मुलाला रूग्णाचा मृतदेह पलंगावरुन उचलून पिशवीत ठेवण्यास सागितले. यावेळी त्याला पीपीई किटही देण्यात आले नाही. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने दोन कर्मचार्यांना निलंबित केले आहे. आणि त्यांच्या विरूध्द योग्य कारवाईचे करण्याचे आश्वासन दिले आहे.
नेमके काय झाले होते ?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) रुग्णालयात ही घटना घडली. पल्लवी उतेकर या ५० वर्षांच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे कांदिवली परिसरातील या रुग्णालयात दाखल केले गेले. श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. २ जुलै रोजी त्यांचे निधन झाले. यानंतर त्यांच्या मुलाला हॉस्पिटलचा फोन आला आणि त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आले. यावेळी रुग्णालयाने आपल्या आईचा मृतदेह पिशवीत भरण्यास आपल्याला सांगितल्याचा आरोप या तरूणाने केला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना या युवकाने सांगितले की,रूग्णालय प्रशासनाच्या या वृत्तीने मला पूर्णपणे धक्का बसला. मी त्यांना सांगितले की माझ्याकडे पीपीई किट नाही. जर मी व्हायरसच्या संपर्कात राहिलो तर मी काय करावे? पण हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की हे मीच करायलाच हवे. म्हणून मग मी माझ्या आईचा मृतदेह पिशवीत भरला. माझा चुलत भाऊही तिथे उपस्थित होता. मी मृतदेह बॅगमध्ये भरला तेव्हा त्याने मला सांगितले की आता हे प्रेत एका स्ट्रेचरवर ठेव आणि तळ मजल्यावर घेवून जा . या संपूर्ण प्रक्रियेत, मला आईच्या संक्रमित प्रेताला बर्याच वेळा स्पर्श करावा लागला.
या घटनेनंतर हा तरुण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्याकडे गेला . तेथे त्यांनी या नेत्याला इस्पितळातील दृष्टीकोन व त्याच्याबरोबर घडलेल्या घटनेविषयी सांगितले.
रूग्णालयाच्या लोकांची काम करण्याची पद्धत मला आवडली नाही. म्हणूनच मी माझी तक्रार घेऊन आमच्या स्थानिक नेत्याकडे गेलो. ते रुग्णालयाच्या डॉक्टरांशी बोलले. माझी तक्रार तिथे पोहोचल्यानंतर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या घटनेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
तरुणांच्या वतीने रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करणारे स्थानिक नेते दिनेश साळवी म्हणाले,जेव्हा तो तरूण आमच्याकडे त्याची तक्रार घेऊन आले, तेव्हा मी रूग्णालयात बोललो. मी रुग्णालय अधिकारी डॉक्टरांबरोबर बोलून त्यांना कठोर कारवाई करण्याची विनंती केली. यानंतर रुग्णालयातील दोन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांवरही कर्मचार्यांवर केलेल्या कारवाईप्रमाणेच कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. यावर अधिकृत डॉक्टरांनी कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले.
मृत महिलेच्या पतीलाही कोविड १९ चा संसर्ग झाला आहे. त्यांना कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आल्यानंतर लगेच बीएमसीच्या दुसर्या रुग्णालयात दाखल केले गेले.
न्यूज अनकट प्रतिनिधी