घरगुती भाडणांतून पत्नीचा खून करुन पतीनेही केली आत्महत्या

चंद्रपूर, ०९ ऑगस्ट २०२२: चंद्रपूर शहरानजीकच्या देवाडा गावात महाकाली नगरी भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे‌. कौंटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली आहे. अशी माहीती स्थानिक पोलिसानी दिली. त्यानंतर पतीनेही आत्महत्या केल्याची पोलिसांनी सांगितले.

सुधाकर आणि स्नेहा डाहूले असे पत्नी व पतीचे नाव आहे. सूधाकर हा एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्यामुळे पगार कमी होता. काटकसर करत तो घरचा व संसारचा गाडा चालवत असे. त्यांना दोन लहान मुले ही आहेत. घरात रोजच वादविवाद होत होता.

अशी माहीती स्थानिक नागरीकांनी दिली असून याच कारणामुळे सुधाकरने हे पाऊल उचलल्याची माहीती समोर आली आहे‌. पत्नीचा गळा दाबून सुधाकरने समोरील खोल विहीरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेने डाहूले कुटुंबातील लहान मुले उघड्यावर आले आहे. पूढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा