हॉकी महाकुंभाचे उत्साहात उद्घाटन स्पर्धेस उद्यापासून प्रारंभ

पुणे, १२ जानेवारी २०२३ : कटक (ओडिशा) येथ १३ जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वकरंडकाची सुरवात होणार आहे. बुधवारी (ता. ११) संध्याकाळी कटक येथील बाराबाटी स्टेडियममध्ये विश्वकरंडकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, ‘एफआयए’चे अध्यक्ष तैयब इकराम आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांच्यासह १६ संघ या कार्यक्रमाला हजर होते. रणवीर सिंह यांच्यासह अनेक स्टार कलाकारांमुळे या कार्यक्रमाला चार चाँद लागले आहेत.

अनेक बॉलिवूड गायक आणि स्थानिक कलाकारांनी हॉकी विश्वकरंडक थीम सॉंग गायिले आहे. जे संगीत दिग्दर्शक प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे. हे थीम सॉंगही या सोहळ्यात काही गायकांसह स्टेजवर सादर करण्यात आले.

विशेष बाब म्हणजे कटकमधील महत्त्वाच्या ठिकाणी १६ फॅन पार्क उभारण्यात आले होते जेथे हजारो हॉकीप्रेमी आणि रसिकांनी भव्य स्क्रीनवर उद्घाटन सोहळा पाहिला.

शुक्रवारपासून (ता. १३ जानेवारी) पुरुष हॉकी विश्वकरंडकाला सुरवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २९ जानेवारी रोजी होणार आहे. भारतासह १६ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. १६ संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले असून, ४४ सामने होणार आहेत. हॉकी विश्वकरंडकात भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत सिंह यांच्याकडे आहे. हॉकी विश्वकरंडक सलग दुसऱ्यांदा भारतामध्ये होत आहे.

हॉकी विश्वकरंडक २०२३ चे सामने १३ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत राउरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आणि भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये होणार आहेत. राउरकेला येथे २० सामने होतील, तर फायनलसह २५ सामने भुवनेश्वरमध्ये खेळवले जातील.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा