२०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ९ टक्क्यांनी घसरणार, एडीबी’चा अंदाज

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२०: आता आशियाई विकास बँकेनं (एडीबी) असा अंदाज लावला आहे की या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ९ टक्क्यांनी घसरेल. या आधी अनेक रेटिंग एजन्सींनी भारतीय अर्थव्यवस्थेत ९ ते १५ टक्के घसरण झाल्याचा अंदाजही जाहीर केलाय.

कोरोना संकटामुळं देशाच्या जून तिमाहीतील जीडीपीमध्ये २३.९ टक्क्यांनी घट झालीय. बर्‍याच रेटिंग एजन्सीनी अंदाज व्यक्त केला आहे की या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घट होईल.

काय म्हणाली एडीबी

मंगळवारी एडीबीनं जाहीर केलेल्या एशियन डेव्हलपमेंट परिदृश्य (एडीओ) -२०२० च्या अद्ययावत अहवालात म्हटलं आहे की, ‘कोरोना विषाणूमुळं भारतातील आर्थिक कामकाजावर परिणाम झाला आहे. यामुळं ग्राहकांच्या संवेदनावरही परिणाम झाला असून यामुळं चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) ९ टक्क्यांची घसरण होईल.

९ ते १५ टक्के आकडेवारी

महत्त्वाचं म्हणजे या प्रकारे, अनेक रेटिंग एजन्सींनी या संपूर्ण आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत ९ ते १५ टक्के घसरण होण्याचे आकडे जाहीर केले आहेत. कोरोना संकटामुळे या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था १०.५ टक्क्यांनी घसरू शकल असा अंदाज रेटिंग एजन्सी फिच’नं जाहीर केला होता.

इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्स’चा अंदाज आहे की, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १४.८ टक्क्यांनी घसरल. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च (Ind-Ra) ने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये ११.८ टक्के घट झाल्याचा अंदाज जाहीर केलाय. रेटिंग एजन्सी क्रिसिल’नं म्हटलं आहे की आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताची एकूण देशांतर्गत उत्पाद (जीडीपी) ९ टक्क्यांनी घसरू शकेल.

पुढील आर्थिक वर्षात प्रचंड वाढ

पुढील आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी तेजी येईल, असा एडीबी’चा अंदाज आहे. एडीबी’नं सांगितले की, पुढच्या आर्थिक वर्षात, रहदारी व व्यवसायातील कामं उघडल्यामुळं भारताचा जीडीपी विकास दर ८ टक्क्यांच्या आसपास राहील.

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार एडीबी’चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ यासुयुकी सवादा म्हणाले की, “साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी भारतानं कडक बंदोबस्त केलाय.” यामुळं आर्थिक कामांवर तीव्र परिणाम झाला. ते म्हणाले, ‘पुढच्या आर्थिक वर्षात आणि त्याही पलीकडं अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, तपासणी करण्यासाठी, देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्याची क्षमता वाढविणं महत्त्वाचं आहे. या उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, तरच अर्थव्यवस्था सुधारेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा