इन्सॉल्वेंसी अँड बँकरप्सी कोड (सेकंड एमेंडमेंट) बिल , संसदेत ही बिलं होणार आज पास

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२०: या आठवड्यात सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनात ३० खासदारांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळं आता संसदेचा कालावधी कमी केला जाण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत चालणार होतं, पण आता ते एक आठवडा आधीच संपवण्याची शक्यता आहे. संसदेच्या दोन वरिष्ठ अधिका-यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान देशात कोरोना प्रकरणांची संख्या वाढून ५३ लाख झालीय.

वित्त मंत्री निर्मला सीतारमण आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संसद अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी राज्यसभेत हे विधेयक मांडलं. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, किरण रिजिजू आणि रतनलाल कटारिया हे सभागृहात विधान करतील. सीतारमण इनसॉल्वेंसी अँड बँककरप्सी संहिता (दुसरी दुरुस्ती) विधेयक २०२० आणि बँकिंग रेग्युलेशन (दुरुस्ती) विधेयक २०२० दुरुस्ती मंजुरीसाठी पुढं करतील. तर हर्षवर्धन महामारी रोग (सुधारणा) विधेयक २०२० सादर करतील.

दुपारी ३ वाजता लोकसभेचं सत्र सुरू होईल, सीतारमण कर आकारणी व इतर कायदे (काही तरतुदींमध्ये सुधारणा व काही बदल) विधेयक २०२०, कंपन्या (दुरुस्ती) विधेयक २०२०, क्वालिफाइड फिनान्सिअल कॉन्ट्रॅक्ट २०२०, द्विपक्षीय नेटिंग व फॅक्टरिंग रेग्युलेशन्स ( दुरुस्ती) विधेयक २०२९ सादर करतील. यानंतर नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी विधेयक २०२० आणि नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी विधेयक २०२० गृहमंत्री अमित शहा सादर करतील.

आजच्या खालच्या सभागृहात इतर विधेयकं ठेवण्यात आली आहेत ज्यात व्यावसायिक सुरक्षा संहिता, आरोग्य आणि कामाच्या अटी २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०१९, सामाजिक सुरक्षा २०१९ वर संहिता, व्यावसायिक सुरक्षा, स्वास्थ्य आणि वर्किंग कंडीशंस कोड २०२०, द कोड ऑन सोशल सिक्योरिटी २०२० इत्यादींचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा