पुणे, 19 सप्टेंबर 2021: जर तुम्ही iPhone 12 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी असू शकते. कारण, हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर आतापर्यंतच्या सर्वोत्तम किंमतीत विकला जात आहे. iPhone 13 लाइनअप आल्यानंतर कंपनीने iPhone 12 ची किंमत कमी केली आहे.
iPhone 12 च्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत आता Appleच्या अधिकृत स्टोअरवर 65,999 रुपये आहे. त्याचबरोबर हा फोन फ्लिपकार्टवर 63,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत लॉन्च झाल्यापासून या फोनची सर्वात कमी किंमत आहे.
हा फोन 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. या अर्थाने, लाँच किंमतीच्या तुलनेत यामध्ये 15,901 रुपयांची सूट दिली जात आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय ट्रांजेक्शनवर 10 टक्के सूट देखील मिळवू शकतात.
देण्यात येणारी सूट केवळ 64GB व्हेरिएंटपुरती मर्यादित नाही. 128GB व्हेरिएंटवर ग्राहकांना ऑफरचा लाभ देखील मिळेल. iPhone 12 128 जीबी प्लॅटफॉर्मवर 68,999 रुपयांना विकले जात आहे. हे आधी 84,900 रुपयांना लाँच करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ग्राहक 256GB व्हेरिएंट 78,999 रुपयांना खरेदी करू शकतात.
हा डिस्काउंट आणखीन चांगला करण्यासाठी ग्राहक एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकतात. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहक या फोनवर 15,000 रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकतात. अमेझॉनवरही अश्याच ऑफर दिल्या जात आहेत.
Appleने नुकतीच आपली iPhone 13 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजअंतर्गत iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 pro आणि iPhone 13 प्रो मॅक्स लाँच करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे