दुबई, ५ सप्टेंबर २०२०: यंदा IPL चे सत्र हे दुबईत होणार असून कोरोनाच्या या काळात देखील अनेक संघ हे सराव करत आहेत. त्यातच किंग्स ११ पंजाबचे क्षेत्ररक्षण कोच जाँटी र्होर्डस यांनी “दिर्घकाळ क्रिकेट पासून दूर असलेल्या खेळांडूसाठी सामना खेळण्यास सज्ज होण्याआधी आयपीएलमध्ये सराव सामने आयोजित करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच ते पुढे म्हणाले “माझ्यासारख्या कोचिंग स्टाफकडे खेळाडूंना भावनात्मक आधार देण्याची जबाबदारी आहे. सर्वच खेळाडू लयीत असून, नेट्सवर स्वाभाविक खेळ करताना दिसत आहे.
उद्या होणार वेळापत्रक जाहीर
आयपीएलची तयारी ही प्रत्येक संघाची चढ – उतार परिस्थितीत जोर धरत असून,अजुनपर्यंत वेळापत्रक हे जारी करण्यात आलेले नाही. मात्र खेळाडूंची आणि चाहत्यांची प्रतिक्षा उद्या संपणार असून आयपीएलच्या सामन्यांचे वेळापत्रक उद्या जाहीर करण्यात येणार आहे.अशी माहिती आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी