यूएई, २० सप्टेंबर २०२०: कोरोना विषाणूमुळं रिक्त स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) भरविण्यात येत आहे, परंतु जगातील सर्वाधिक आकर्षक टी -२० लीगच्या चकाचकपणासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. स्टेडियम रिक्त असलं तरी काल झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये ना प्रेक्षकांची कमतरता भासली ना चिअर गर्ल्स ची कमतरता भासली.
वास्तविक, फ्रँचायझी संघांनी गेल्यावर्षी रेकॉर्ड केलेल्या प्रेक्षकांच्या आवाजानं वातावरण जिवंत ठेवलं. या कृत्रिम आवाजा दरम्यान शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) सामना खेळण्यात आला. तसंच, सामन्यादरम्यान ‘व्हर्च्युअल’ चीअरलीडर्सही प्रचंड पडद्यावर आपली भूमिका साकारताना दिसल्या.
शेख जायद स्टेडियमची २०,००० प्रेक्षकांची क्षमता आहे, जे पूर्णपणे रिक्त होतं. खेळपट्टीवर फक्त २२ खेळाडूखेरीज अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा आणि काही अन्य लोक तिथं उपस्थित होते आणि अशा वातावरणात आयपीएल सुरू झालं.
बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी व्हीआयपी बॉक्समध्ये बसले होते, ज्यात अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यासह अमीरात क्रिकेट बोर्डाचे अधिकारी सामाजिक अंतर लक्षात घेऊन एकमेकांपासून पुरेसं अंतर ठेवत उपस्थित होते.
चेन्नई सुपर किंग्जचा करिष्माई कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं टॉसदरम्यान विनोदानं सांगितलं की, सामाजिक अंतराच्या मार्गदर्शनाखाली आपण ‘एक स्लिप’ ठेवू शकतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे