अहमदाबाद : एका वर्गामध्ये शेवटच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याने विद्यार्थिनीसोबत किस घेतला. दोघांच्या किसचा 30 सेंकदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोरवा हडफ भागातील एका हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे शाळा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ३० सेकंदाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेवटच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला जवळ घेतले आणि किस करू लागला. यावेळी एका विद्यार्थ्याने संबंधित प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली.
शाळेचे मख्याध्यापक अश्विन पटेल म्हणाले, २३ जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवण्यात आले आहे. परंतु, अद्याप ते आलेले नाही. शिवाय, वर्गामध्ये मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे.











































