टेंभुर्णी येथे येत्या दोन दिवसात ग्रामपंचायतीच्या वतीने कोवीड सेंटर सुरु होणार

टेंभुर्णी, ३ ऑक्टोबर २०२० : तज्ञ डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी यासाठी सरपंच प्रमोद कुठे यांनी दिले प्रांताधिकारी यांना निवेदन.

टेंभुर्णी येथे ग्रामपंचायतच्या वतीने ऑक्सिजन बेड सुविधेसह कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असून या कोविड सेंटरसाठी शासनातर्फे डॉक्टरची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच व सदस्यांनी प्रांतधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कुर्डुवाडी येथील प्रांतधिकारी ज्योती कदम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,टेंभुर्णी शहर व परिसरात सध्या कोरोना संसर्गाचा कहर सुरू असून कोरोना संसर्गाने अनेक जण पीडित आहेत.कुर्डुवाडी,सोलापूर,पुणे याठिकाणी उपचार ते घेत आहेत.या आजाराने सात-आठ जणांचा मृत्यू झाला असून काहीजण ऐन तरुणपणात कोरोनाने आपला जीव गमावून बसले आहेत.ज्यांचे निधन झाले त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

कोरोना संसर्ग झालेल्यांना कुर्डुवाडी कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. ज्यांना कमी लक्षणे आहेत व ज्यांच्याकडे अायसोलेशनची सोय आहे.त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत असे असून ही कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे.तेथे सहज बेड उपलब्ध होत नाही.शासन योग्य प्रकारे रुग्णास मदत करीत आहे.टेंभुर्णी ग्रामपंचायतीनेही कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केलेल्या असून नागरिकांना कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या वारंवार सूचना करीत आहोत.

तसेच गरीब कुटुंबातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल व त्यास ऑक्सिजन बेडची गरज भासल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागतात.तेथेही बेड उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.खाजगी रुग्णालयाचे दर गरिबांना परवडणारे नाहीत.यासाठी टेंभुर्णी ग्रामपंचायतने टेंभुर्णी येथेच ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी शासनाने योग्य आहर्ताधारक डॉक्टरची नेमणूक करावी असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी सरपंच प्रमोद कुटे,गणेश केचे,सोमनाथ कदम,डॉ.सोमनाथ साळुंके,अमोल धोत्रे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा