गोल पोस्ट आरोग्य “या” लसीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरु, लवकरच येणार परिणाम….

“या” लसीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरु, लवकरच येणार परिणाम….

वॉशिंग्टन. २८ जुलै २०२०: संपुर्ण जगभरात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. तर जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ६० लाखावर पोहचली आहे. त्यात जगभरात या कोरोना महामारीने ६ लाखपेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. तर अशातच जर मानवी आस्तित्व वाचवायचे असेल तर लसी शिवाय पर्याय नाही असे बोलले जात आहे. तर जगभरात १०० लसीवर एकाच वेळेस काम सुरु आहे. ज्यामध्ये काही लशी या मानवी टप्प्यात पोहचल्या तर ३ लसी या सध्या शेवटच्या टप्प्यावर असून त्यातील एका लसीची चाचणी आता सुरु होणार असल्याचे कळत आहे.

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ अँड मॉडर्ना इंक कंपनीने म्हणजेच अमेरिकेने तयार केलेली MRNA 1273 ही लस तयार केली आहे. मॉडर्नाच्या पहिल्या टप्प्याच्या चाचणीमधे ४५ लोकांना ही लस देण्यात आली आहे. त्यावेळी या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बचाव  दिसून आला होता आणि याचे सकारत्मक परिणाम दिसले होते. तर ताप आणि वेदनासारखे सौम्य दुष्परिणामही दिसून आले. आता ही लस ३०,००० लोकांना दिली जाणार आहे. ज्या लोकांना ही लस दिली जाणार आहे, त्यांना खरी लस दिली जात आहे की खोटी (डमी) याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. दोन डोस दिल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे यामध्ये तपासले जाणार आसल्याचे सांगितले जातयं.

देशात वापरल्या जाणाऱ्या लसीचे टेस्ट स्वत:च करावं या उद्देशाने अमेरिकेने लसीची चाचणी सुरू केली आहे. प्रगत टप्प्यात असलेल्या कंपनीच्या लसीची चाचणी ३० हजार लोकांवर होईल. या महिन्यात मॉडर्ना, पुढील महिन्यात ऑक्सफर्ड, सप्टेंबरमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन आणि ऑक्टोबरमध्ये नोवावॅक्सच्या लसीचा अभ्यास होईल. फाइजर आयएनसी स्वत:च आपल्या ३० हजार लोकांवर चाचणी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आत्ता पर्यंत चाललेल्या चाचण्यांमधे लस हि विविध टप्प्यात यशस्वी होत आहे.तर जगातील हि पहिलीच वेळ आहे ज्यामध्ये एका व्हायरसच्या लसीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु असल्याचे.तर लसीसाठी होणा-या अनेक टप्प्यांची देखील यात कपात करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version