ध्वजारोहणाची यादी दुसऱ्यांदा बदलली, पुण्यात राज्यपाल रमेश बैस तर रायगडमध्ये चंद्रकांत पाटील करणार ध्वजारोहण

3

मुंबई, ११ ऑगस्ट २०२३ : राज्यात तीन पक्षाचे सरकार आल्यामुळे सरकार चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार आहे. भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. कारण शिवसेनेत मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना खातेवाटपही झाले. परंतु यानंतर वादामुळे पालकमंत्रीपदाचे वाटप केले गेले नाही. आता हाच वाद ध्वजारोहण समारंभात उफाळून आला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाची यादी दोन वेळा बदलली आहे.

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार इच्छुक आहेत. परंतु येथील पालकमंत्री पद भाजपला हवे आहे. तोच वाद रायगड जिल्ह्यासाठी आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आमदार भरत गोगावले आपला वारंवार दावा करत आहेत. यामुळे १५ ऑगस्टसाठी ध्वजारोहणाची यादी तयार केली गेली. त्यात रायगडला जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार होते. पुणे शहरात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते.

पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी दुसऱ्यांदा यादी बदलण्यात आली आहे. जुन्या यादीनुसार पुण्यात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. आता नवीन यादीनुसार चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहे. यामुळे पुण्यात ना चंद्रकांत पाटील ना अजित पवार असा तोडगा काढला गेला आहे. अमरावतीत छगन भुजबळ ध्वजारोहण करणार आहेत. अजित पवार कोल्हापुरात ध्वजारोहण करणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा