जिवंत व्यक्तीलाच आला स्वतःच्या मृत्यूचा दाखला घेण्यासाठी शासकीय विभागाचा फोन

6

ठाणे, ३ जुलै २०२१: ठाण्यामध्ये एक विचित्र घटना घडली, हे जाणून तुम्ही अचंबित व्हाल आणि आश्चर्यचकित व्हाल की हे घडेल काय? खरं तर ठाण्यात एका जिवंत व्यक्तीला स्वतःच्या मृत्यूचा दाखला घेण्यासाठी शासकीय विभागाचा फोन आला. ठाणे येथील स्थानिक रहिवासी चंद्रशेखर देसाई यांनी “माझा मृत्यू प्रमाणपत्र घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचा फोन आला आहे,” असा आरोप केला. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यावर ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप मालवी म्हणाले की तांत्रिक चुकीमुळे हे घडले.

या यादीची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले असल्याची ग्वाही महापालिकेच्या वतीने अधिकाऱ्यांनी चंद्रशेखर देसाई यांना दिली. पालिका अधिकारी मालवी म्हणाले, “आम्हाला ही यादी पुणे कार्यालयाकडून मिळाली होती कारण आमच्याकडून ती तयार झाली नव्हती. मृत्यूच्या यादीत त्यांचे नाव आले ही एक तांत्रिक चूक होती. आम्ही आमच्या कार्यसंघाला यादीची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत व त्यानंतर लोकांना बोलवावे,” अशी माहिती त्यांनी एएनआयला दिली.

ही घटना उघडकीस आल्यानंतर लोक आता इंटरनेटवरून मनपाची खिल्ली उडवित आहेत. दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्र कोरोनाचे ९,१९५ नवीन प्रकरणे आढळली आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार संसर्ग झालेल्यांची संख्या ६०,७०,५९९ वर गेली आहे. या व्यतिरिक्त आणखी २५२ लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला असून त्यानंतर मृतांचा आकडा १,२२,१९७ वर गेला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा