युक्रेन, एपी, खारकीव्ह : रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज २३० वा दिवस. पण हे युद्ध थांबण्याचे चिन्हच दिसत नाही. तर आता यात दोन्हींचे नुकसान होताना दिसत आहे. त्यानुसार आता रशियातून रशियाने काबीज केलेल्या क्रिमियाला जोडणाऱ्या एक महत्त्वाच्या पुलाचे शनिवारी एका ट्रकमधील बॉम्बच्या स्फोटात मोठे नुकसान झाले. या स्फोटाने या पुलाचा महत्त्वाचा भाग कोसळला. त्यामुळे दक्षिण युक्रेनमध्ये रसद पुरवण्यासाठीचा रशियाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. क्रिमियातील रशिया समर्थक पार्लमेंटच्या अध्यक्षांनी या स्फोटामागे युक्रेन असल्याचा आरोप केला आहे. मात्र, रशियाने याबाबत युक्रेनवर आरोप केलेला नाही.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या पुलावर हल्ला करण्याची वारंवार धमकी दिली होती. या स्फोटाचे युक्रेनच्या काही अधिकाऱ्यांनी स्वागतही केले. मात्र, हे अचानक थांबवून युक्रेनने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ७० व्या वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी हा बॉम्बस्फोट झाला. पुतिन यांना हा मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. युक्रेन युद्धात मिळालेल्या प्रारंभीच्या यशात आता त्यां रशियाच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी समितीने सांगितले, की ट्रकमधील बॉम्बस्फोटात इंधन वाहून नेणाऱ्या सात रेल्वे डब्यांना आग लागली. परिणामी पुलाचे दोन भाग अर्धवट कोसळले. हा पूल काळा समुद्र आणि अझोव्ह समुद्र यांना जोडणारा केर्च सामुद्रधुनीवर १९ किलोमीटरचा (१२ मैल) हा पूल २०१८ मध्ये कार्यान्वित झाला. हा युरोपमधील सर्वात लांब पूल आहे. रशियाने २०१४ मध्ये युक्रेनमधील क्रिमिया भागाचे रशियात विलीनीकरण केले. तीन अब्ज सहा कोटी डॉलरचा हा प्रकल्प रशियाच्या क्रिमियावरील दाव्याचे मूर्त प्रतीक आहे. त्यामुळे क्रिमियाच्या द्वीपकल्पाला रशियाला जोडले गेले होते.
आता रशियाला जोडणा-या या पुलाच्या नुकसानीमुळे रशियाचे खूप मोठे नुकसान झाले असून त्यामुळे रशिया आता काय निर्णय घेणार, आणि कोणती भूमिका घेणार याकडे नाटोचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नाटो आता या नुकसानीनंतर युद्ध थांबवण्याची मागणी करणार का? यावर आता सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस