“The lost supper” एक सर्जनशील नाट्यनिर्मिती

The Lost Supper play based on Swami Vivekananda
"The lost supper"

The Lost Supper play based on Swami Vivekananda: स्वामी विवेकानंद आपल्याला एक संन्यासी आणि तत्त्वज्ञ म्हणुन माहित आहेत. पण त्यांच्या बाबतीत असलेली खास गोष्ट म्हणजे ते एक उत्तम स्वयंपाकी आणि संगीतकारदेखील होते.स्वामीजींनी भगिनी निवेदितासोवत त्यांच्या निर्वाणाच्या दोन दिवस आधी एका सायंकाळी मेजवानी घेतली. विविध पद्धतीचे पदार्थ स्वामीजीनी स्वतः बनवले होते. त्यांच्या अंतिम भेटीवर आधारित नवकोर नाटकं आपल्या भेटीस येणार आहे.

ही सगळी गोष्ट आजच्या काळात म्हणजे १२३ वर्षांनंतर आपल्याशी संबंधित कशी आणि या विस्मरणात गेलेल्या मेजवानीतून मिळणारी शिकवण याची उकल नाटक अनुभवल्यानंतर येईल. त्याचबरोबर त्यांच्या या नाटकात त्यांच्या अंतिम भेटीची एक सृजनशील पुनर्रचना केली आहे. काय बोललं गेल असावं किंवा काय न बोलताही जाणवलं, याचा मागोवा घेतला आहे. ही सगळी गोष्ट आजच्या काळात म्हणजे १२३ वर्षांनंतर आपल्याशी संबंधित कशी आणि या विस्मरणात गेलेल्या मेजवानीतून मिळणारी शिकवण याची उकल नाटक अनुभवल्यानंतर येईल

स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता या दोघांमधला मुळ संवाद इंग्रजी भाषेत झाला होता. संदर्भ साहित्य इंग्रजी भाषेत असल्यानं नाटक इंग्रजीत केलं आहे. त्याचे प्रयोग भारतात आणि कालांतरानं जगभर कावे, या उद्देशानं इंग्रजी भाषेची निवड केली आहे.’ स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या भगिनीमधला हा प्रसंग २ जुलै १९०२ला घडला. येत्या २ जुलैला त्या प्रसंगाला १२३ वर्ष पूर्ण होत आहेत. हेच निमित्त साधून त्याच दिवशी आणि हा प्रसंग प्रत्यक्ष घडला त्याच वेळी या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे.हे नाटक सत्य घटनेवर आधारित असून त्यातले संवाद डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लिहीले आहेत, प्रतिमा कुलकर्णी यांनी दिग्दर्शन आवाहन आयपीएच आणि सुबक या विद्यमाने नाटकाची निर्मिती केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर