पुणे, २७ ऑक्टोबर २०२२ : मालिकांचे विश्व सध्या जोरदार जोशात सुरु असताना प्रेक्षकांनी मात्र जुन्या मालिकांना पसंती दिली आहे. जुन्या मालिका रामायण, महाभारत, नुक्कड, हमलोग यांसारख्या आशययुक्त मालिका आता रसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्याला कारण सध्याच्या मालिका आहेत. काही विशिष्ट मालिका सोडल्यास नवीन मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
त्याला महत्वाचे कारण म्हणजे सगळ्या मालिकांचे सिक्वल आणल्याने त्यातला रस निघून गेला आहे. त्यातला आशय महत्त्वाचा मानला जातो. पण तो आशय आता निघून गेल्यामुळे प्रेक्षकांनी मालिकांपेक्षा सिनेमा आणि नाटकांना जास्त महत्त्व दिल्याचे दिसून आले आहे.
वास्तविक मालिका या मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असतात. पण सध्याच्या मालिकांमुळे प्रेक्षकांची डोकेदुखी वाढत आहे. टीआरपीच्या शर्यतीत आता मालिकांनी कंटेंट म्हणजेच आशय आणि भपकेपणा यावर भर दिल्याचं दिसून आलं आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मधल्या काळात असल्या भिकारड्या मालिका पाहू नका… असे म्हणत मालिकांवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे या मालिका नक्कीच कौतुकास्पद नाही, हे पूर्णपणे मान्य करणे आवश्यक आहे.
सध्याच्या मालिकांमध्ये साधेपणा, आशय आणि अभिनय या तिन्ही गोष्टींचा अभाव असल्याने आता मालिका या नीरस होऊ लागल्या आहे. त्यामुळे आता मालिंकापेक्षा नाटक आणि सिनेमाची गर्दी वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. चॅनल्समधील चुरस स्पर्धा लोकांची मन मोडत असल्याचं दिसून येत आहे. हेच वास्तव आहे, हे मात्र खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस